बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आठवड्याभरातच कोरोनामुक्त झाला सोनू सूद, कंगणा म्हणाली…

मुंबई | अभिनेता सोनू सूद यानं कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी सोनूनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की, त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. सोनूच्या या पोस्टवर अभिनेत्री कंगणा राणावतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगणाने त्याचं श्रेय लसीला दिलं आहे. कंगणा म्हणते की, भारतात तयार केलेल्या लसीमुळं सोनू सूद इतक्या लवकर बरा झाला आहे. कंगणानं पुढं सोनूला भारतात बनवलेल्या लसीविषयी लोकांना जागरूक करण्यास सांगितलं आहे.

कंगणानं तिच्या ट्विटर हॅंडलवरून ट्विट केलं आहे. सोनू जी, मला वाटतं की तुम्ही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यामुळेच इतक्या लवकर बरे होऊ शकला आहात. आपण भारतात तयार केलेल्या या लसीचं कौतुक केलं पाहिजे आणि ही लस घेण्यासाठी लोकांना जागरूक देखील केलं पाहिजे, असं कंगणाने म्हणाली.

कंगनाच्या या ट्वीटवर युजर्स बऱ्याच कमेंट करत आहेत. कोणी विचारत आहे की, आपल्याला लस कधी मिळेल? तर कोणी म्हणत आहे की सोनू लवकरच स्वतःची लस घेऊन येईल. मात्र, कंगणाच्या या ट्विटवर सोनूची काय प्रतिक्रिया असेल, तो तिला काय उत्तर देईल? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, आपण कोरोनाशी लढाई कशी लढावी, हे सोनूने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. सोनू म्हणतो की आपण कोरोना पॉझिटिव्ह असाल तर औषधांसह आपल्याला स्वतःला सकारात्मक ठेवावं लागेल आणि अशा प्रकारे आपण लवकरच बरे होऊ शकता. तो म्हणाला होता की, मी सर्वांना सांगू इच्छितो की जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असाल तर, तुमची काळजी घ्या कारण कोणीही इतर तुमची काळजी घेणार नाही आणि ही कोरोनाची सर्वात भयानक गोष्ट आहे.’

 

 

 

थोडक्यात बातम्या

न्या. एन. व्ही. रमणा भारताचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ

“लवकरच आणखी एका मंत्र्याची अवस्था अनिल देशमुखांसारखी होईल”

“खरा सचिन वाझे मंत्रालयावर होता की सिल्वर ओकवर?”

मला डायरेक्ट मेसेज करा, शक्य होईल तेवढी मदत मी करेन- रिया चक्रवर्ती

“अनिल देशमुखांवर झालेली कारवाई ही सोची समझी चाल, लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More