Kangana Ranaut | अभिनेत्री तथा खासदार कंगना रनौत कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहत असतात. आता कंगना पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.त्यांनी पुरुष आणि महिलांबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर पुरुषांना कशा मुली आवडतात आणि कशा आवडत नाहीत, याबद्दल देखील कंगना यांनी भाष्य केलं आहे. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलंय. (Kangana Ranaut)
“तुम्ही जर नेहमी नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, हा सर्वात मोठा रेड फ्लॅग आहे. समोरच्या व्यक्तीचं नात्यात 40 टक्के आणि तुमचं 60 टक्के योगदान असेल तरी नातं जास्त काळ टिकणार नाही. तुम्ही जर जास्तच इमानदार आणि प्रामाणिक आहात तर तुमच्यामध्ये कधीच संतूलन राहणार नाही.”, असं कंगना म्हणाल्या आहेत.
कंगना रनौतचं मोठं वक्तव्य
मुलींबद्दल देखील कंगना यांनी मोठं विधान केलं आहे. “मुलींना याबद्दल विश्वास बसणार नाही, पण यामध्ये खूप तथ्य आहे. तुम्ही किती स्मार्ट, किती यशस्वी आहात याचा कही फरक पडत नाही. एका पुरुषाला त्याच्यापेक्षा अधिक स्मार्ट आणि यशस्वी स्त्री आवडत नाही. मी खूप जणांच्या नात्यात असं बघितलं आहे.त्यांचे वाद बघितले आहेत. काही पुरुषांमध्ये मेल इगो नसू शकतो. मात्र, बऱ्याच जणांना स्वतःपेक्षा स्मार्ट आणि यशस्वी मुली आवडत नाहीत.”, असं कंगना (Kangana Ranaut) यांनी म्हटलं.
यावेळी कंगना यांनी लग्नाबद्दल देखील भाष्य केलं. “महिला या स्वतः नात्यात बलिदान देतात. त्यामुळे लग्न जास्त काळ टिकून राहतं.”, असं मत कंगनाने मांडलं. पुढे त्यांना पुरुष महिलांपेक्षा अधिक स्मार्ट नसेल तर असे पुरुष महिलांना अवडत नाहीत का?, असा सवाल करण्यात आला. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली.
View this post on Instagram
‘इमर्जन्सी’ चित्रपट येणार चाहत्यांच्या भेटीला
“कमी स्मार्ट आणि यशस्वी पुरुष महिलांचा चांगला मित्र होऊ शकतो पण जोडीदार नाही. एका पुरुषाला आदर मिळवण्यासाठी महिलांपेक्षा अधिक यशस्वी होण्याची गरज आहे.”, असं देखील अभिनेत्री म्हणाली.
दरम्यान, कंगनाच्या चित्रपट करीअरबद्दल सांगायचं झाल्यास त्या लवकरच ‘इमर्जन्सी’ मध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट येत्या 6 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) यांच्या जीवनावर आधारित आहे. यात कंगनाने (Kangana Ranaut) इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
News Title- Kangana ranaut reaction on relationship
महत्त्वाच्या बातम्या –
“एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण, फडणवीस अर्जुन तर शरद पवार शकुनी मामा”
सुप्रिया सुळेंनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण; अजितदादा नव्हे तर ‘या’ नेत्याला बांधली राखी
आज लाडक्या भावाला राखी नेमकी कधी बांधावी?, जाणून घ्या शुभ मुहूर्त
आज रक्षाबंधनाचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार खास, मोठा धनलाभ होणार!
‘या’ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार रोमँटिक टर्न!