बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ होताच कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री कंगना रनौत तिच्या रोखठोक विधानांमुळे कायम टीकेच्या केंद्रस्थानी असते. कंगना आणि वादग्रस्त विधान हे आता जुनं समीकरण झालं आहे. कंगनाचं ट्विटर अकाउंट सस्पेड झाल्यानंतर ती इन्स्टाग्रामवरून प्रतिक्रीया देताना दिसत आहे. पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ होताच कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ पदाचा राजीनामा दिला आणि पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ झालो. यानंतर कंगनाने एक स्क्रिनशॉट शेअर करत प्रतिक्रीया दिला आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून जॅक डोर्सी आणि पराग अग्रवालचा एक फोटो शेअर केला आहे.

या दोघांच्या फोटोचा एक स्क्रिनशॉट शेअर करत कंगनाने त्यासोबत बाय चाचा जॅक, असं कॅप्शन दिलं आहे. कंगनाच्या वादग्रस्त विधानांमुळे तिचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होतं. जॅक डोर्सी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा चाचा असा उल्लेख करत कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, जॅक डोर्सी यांनी ट्विटरमध्ये 16 वर्षांचा प्रवास पूर्ण केला. 16 वर्षांचा प्रवास केल्यानंतर आज मला कंपनी सोडण्याची वेळ आली आहे. माझ्यानंतर पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ असतीत, अशी घोषणा जॅक डोर्सी यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

“शिवसेनेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा”, मनसेची मागणी

“कोलांटीउड्याच्या स्पर्धेत माकडही मागं पडतील, अधिवेशन आलं की यांची तब्येत बिघडते”

दिलासादायक! जगाला टेन्शन देणाऱ्या ओमिक्रॉनवर येणार प्रभावी लस

ट्विटरचा मोठा निर्णय, भारताचे पराग अग्रवाल नवे सीईओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More