बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कंगणाला दारु चढली?, स्वतःचा अर्धनग्न फोटो शेअर करुन म्हणाली…

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि वादग्रस्त विधान हे जुनं समीकरण आहे. कंगना रनौत तिच्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेचा विषय असते. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यावरही कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादांना तोंड फुटलं. शेतकऱ्यांची तुलना खलिस्तान्यांसोबत केल्यामुळे कंगनाविरोधात अनेक ठिकाणी एफआयआर नोंदवण्यात आला.

कंगनाने शीख समुदायाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं असल्याचा आरोप करत शीख समुदायही कंगनाविरोधात आक्रमक झाला होता. त्यानंतर मुंबईत कंगना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर कंगनाविरोधात बुधवारी आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर कंगनाने एक फोटो शेअर तिला याचा कसलाच फरक पडत नसल्याचं सांगितलं आहे. (Kangana Ranaut Post)

कंगना रनौत हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बोल्ड ड्रेस घालून कंगना वाईन पिताना दिसत आहे. अजून एक दिवस, अजून एक एफआयआर. जर मला पोलीस पकडायला आलेच तर माझी घरातही तशीच अवस्था आहे, असं कॅप्शन देत कंगनाने वाईन पितानाचा हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोत कंगना एकदम रिलॅक्स दिसत आहे.

कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर कंगना तिच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचं मत मांडताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कौतुक करताना शेतकऱ्यांची खलिस्तान्यांशी तुलना केली होती.(Kangana Ranaut On Farmers Protest) तिच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतरच कंगनाविरोधात अनेक ठिकाणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, वाचा आजचे ताजे दर

पहिली ते सातवीच्या शाळांचीही घंटा वाजणार?, टास्क फोर्सने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

आता विद्यार्थ्यांना महानगरपालिका देणार 51 हजार रुपये, वाचा सविस्तर

राष्ट्रवादीत मोठी खळबळ! ‘या’ आमदारानी दिला पदाचा राजीनामा

आर्यन खान प्रकरणात पंच असलेल्या ‘या’ व्यक्तीला अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More