Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाली आहे. सध्या कंगना ही अनेक कारणाने चर्चेत आली आहे. अभिनेत्री आता भाजपची नवनिर्वाचित खासदार झाली आहे. मात्र आता कंगनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चंदीगडहून कंगना दिल्लीला रवाना व्हायला निघाली होती. तेव्हा एका सेक्युरिटी गार्डने कंगनाच्या कानशीलात लगावली असल्याची माहिती समोर आली आहे.
गार्डने कंगनाच्या कानशिलात लगावली
कंगना राणौतने (Kangana Ranaut) शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केलं होतं. यामुळे सीआयएसएफ गार्डने कानशिलात लागवल्याची माहिती समोर आली आहे. महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने कंगनाच्या कानशिलात लगावली आहे. कंगनाने कानशिलात लगावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संबंधित घडलेली घटना ही दुपारी साडे तीन वाजता घडली होती. कंगनाला चंदीगडहून दिल्लाला निघाली होती. सीआयएसएफच्या महिला सेक्युरिटी गार्डने तपासणीदरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी कंगनासोबत असलेल्या मयंक मधुरने कुलविंदर कौरला थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेबाबत कंगनाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ती विमानाने दिल्लीला रवाना झाली. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Kangana Ranaut slapped by CISF constable Kulwinder Kaur at Chandigarh airport for calling protesting farmers Khalistanis. pic.twitter.com/IGfXz2l4os
— Prayag (@theprayagtiwari) June 6, 2024
मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना राणौतला (Kangana Ranaut) भाजपने उमेदवारी दिली होती. कंगनाला उमेदवारी दिल्यानंतर एक नवा वाद निर्माण झाला होता. काँग्रेसच्या एका नेत्याने कंगानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून कंगनाची चर्चा होताना दिसत आहे. अखेर कंगनाचा विजय झाला. (Kangana Ranaut)
कंगना मंडी लोकसभा मतदारसंघात 74 हजार 755 मतांनी विजयी
कंगना मंडी लोकसभा मतदारसंघात 74 हजार 755 मतांनी विजयी झाली आहे. कंगाने विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला. कंगना हिच्यासाठी हा विजय खूप विशेष आहे. असं असताना तिला आज अचानक विमानतळावर अशा घटनेला सामोरं जावं लागल्यामुळे तिच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली.
News Title – Kangana Ranaut Slapped At Chandigharh Airport
महत्त्वाच्या बातम्या
‘अजित पवारांनी गुरंढोरं सांभाळावीत’; ‘या’ नेत्याचा अजितदादांना खोचक सल्ला
अजित पवार-एकनाथ शिंदेंवर बूमरँग होणार?; मोठी माहिती समोर
“मी पुन्हा येईन…पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे आता बारा वाजलेत”
निकालानंतर अजित पवार गप्पच; आमदारांची धाकधूक वाढली, मोठा निर्णय घेणार?
“एकनाथ शिंदेंवर दबाव होता, तिकीट मिळू नये म्हणून स्क्रिप्ट..”; शिंदे गटाच्या खासदाराचा गौप्यस्फोट