बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कंगना रणौत योगींच्या भेटीला, ‘या’ मोहिमेची बनली ब्रँड अॅम्बेसिडर

नवी दिल्ली | आपलं परखड मत मांडणारी अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असलेली पहायला मिळते. अशातच आता कंगना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतीच कंगनानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्याथ यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर आता वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

कंगनानं शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उत्तर प्रदेश सरकारकडून आता कंगनाला सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. आता कंगनाच्या या भेटीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कंगनानं एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये योगी आदित्यनाथ आणि कंगना चर्चा करताना दिसत आहेत. त्यांच्या या चर्चेनंतर उत्तर प्रदेश सरकारकडून कंगनाला ODOP ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आलं.

दरम्यान, या भेटीत योगी आदीत्यनाथ यांनी कंगनाला एक भेटवस्तूही दिली. कंगनानं त्याचाही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. योध्येतील राम मंदिराच्या भुमीपूजनावेळी वापरण्यात आलेले नाणं त्यांनी भेटवस्तू म्हणून दिलं आहे.

थोडक्यात बातम्या –

….अन् या पठ्ठ्याने नवरीला नेण्यासाठी थेट जेसीबीच मागवला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“खडसे साहेब एखादा शूटर लावून मला मारुन तरी टाका”

“महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून भाकीत होत आहेत, भाजपने ज्योतिषी बदलावा”

मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाकडून दिलासा नाहीच

भाजप नेत्यांच्या मदतीनेच परमबीर सिंह परदेशात फरार झाले – नाना पटोले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More