मुंबई | सध्या ख्रिसमस सण संपुर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदा कोरोनाचं सावट असल्याने दरवर्षीप्रमाणे सण साजरा करता येणार नाही. ख्रिसमसला घरी सजावट करून ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. अशातच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगणा राणावतने खोचक अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
मेरी ख्रिसमस फक्त त्यांना जे सर्व भारतीय सणांचा आदर करतात. मेरी ख्रिसमस फक्त अशा लोकांना जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत, असा शब्दात कंगणाने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात कंगणाने ट्विट केलं आहे.
कंगणाने ट्विटमध्ये आपल्या भाचाला कडेवर घेतलं आहे. तिच्यामागे ख्रिसमस ट्री सजवलं आहे. कंगणाच्या ट्विटला तिच्या चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, ‘थलाइवी’ हा कंगणाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये कंगणाने तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांंचं पात्र साकारलं आहे.
Merry Christmas to only those who respect and accept all Indian festivals. Merry Christmas to only those who don’t do selective activism only around Hindu festivals ❤️ pic.twitter.com/GoTT5iLlIH
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 25, 2020
थोडक्यात बातम्या-
“पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं, मी कोल्हापूरला परत जाणार आहे”
“भाजपचे नेते खासगीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक करतात”
शिवसेनेच्या खासदाराने केली ‘या’ दोन जिल्ह्यातील काँग्रेसचे पालकमंत्री बदलण्याची मागणी
फडणवीसांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद पण…- संजय राऊत
दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हे’ 2 खेळाडू कसोटीत करणार पदार्पण