Top News

‘…त्यामुळे जास्त उडू नकोस, मी कंगणा राणावत आहे’; शेतकरी आंदोलनावरुन कंगणा-दिलजीतमध्ये जुंपली

नवी दिल्ली | शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्री कंगणा राणावत आणि बॉलिवूड अभिनेता दिलजित दोसांझ यांच्यात ट्विटर वॉर सुरु आहे. कंगणाने दिलजितवर खालच्या शब्दांत टीका केली. याला दिलजितने जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेला बिलकिस बानो म्हणत त्यांची खिल्ली उडविली होती. त्यावर दिलजित दोसांझ याने कोणी इतकेही आंधळे असू नये, अशी टीका केली होती. यावर उत्तर देताना कंगणाने दिलजितला करण जोहरचा ‘पाळीव कुत्रा’ म्हटलंय.

तू रोज ज्यांची चाटून काम मिळवतोस मी त्यांची रोज वाजवते. त्यामुळे जास्त उडू नकोस. मी कंगना राणावत आहे, तुझ्यासारखी चमची नाही, असं कंगणा म्हणाली.

कंगणाने केलेल्या टीकेला दिलदितने पुन्हा ट्विट करत उत्तर दिलं आहे. तू आजपर्यंत जितक्या जणांबरोबर चित्रपट केलेस, त्यांची तू पाळीव आहेस का? मग तर ही यादी वाढतच जाईल. आम्ही बॉलिवूडवाले नाही तर पंजाबवाले आहोत. खोटं बोलून लोकांना चिथवणं आणि भावनांशी खेळणं तुला चांगलं जमतं, असं दिलजित म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अबोल असले तरी चतुर आहेत- शरद पवार

कंगणा राणावतचं ट्विटर हँडल बंद करण्यात यावं यासाठी हायकोर्टात याचिका दाखल!

खळबळजनक! मुंबईत 2 लेकींची हत्या करून वडिलांनी संपवलं आयुष्य

सोलापूरच्या शिक्षकाला 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर!

शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांच्या आरोपांवर भावजय पल्लवी आमटे म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या