महाराष्ट्र मुंबई

“पेंग्विनसारखा दिसतो तर पेंग्विनच म्हणणार आणि पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना”

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. यावरून अभिनेत्री कंगणा राणावतने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात?, असा सवाल कंगणा राणावतने केला आहे. कंगणाने या संदर्भात एक व्हीडिओ शेअर केला आहे.

पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो. पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना…वडिलांच्या पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना. सोनियासेना म्हटल्यावर राग येतो का तुम्ही आहात सोनियासेना, असं म्हणत कंगणाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वांमी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात?, असं कंगणाने म्हटलं आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील, असं कंगणा म्हणालीये.

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

अर्णबच्या सुटकेपर्यंत आम्ही काळ्या पट्ट्या बांधू- चंद्रकांत पाटील

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल”

“अर्णब आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पाळत नाही”

“सुशांतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णबचं नाव, तरीही कारवाई का झाली नाही?”

अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या