मुंबई | विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगणा राणावतवर निशाणा साधलाय.
कंगणा राणावमुळे माझ्या देशभरात माझी आणि माझ्या कुटुंबीयांची बदनामी झाली असल्याचा आरोपही प्रताप सरनाईक यांनी केलाय.
प्रताप सरनाईतक म्हणाले, “कंगणा राणावतने माझ्या घरी पाकिस्तानी क्रेडीट कार्ड सापडल्याचं खोटं ट्विट केलं होतं. या कारणामुळे संपूर्ण देशभरात माझी तसंच माझ्या कुटुंबीयांची बदनामी झालीये. शिवाय माझ्या कुटुंबीयांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रासही सहन करावा लागला.”
ते पुढे म्हणाले, “याचसंदर्भात मी सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केलाय. या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळावी अशी मी विनंती सभागृहाला केलीये आहे. खोटं ट्विट करणाऱ्या कंगणाला शिक्षा झालीच पाहिजे.”
थोडक्यात बातम्या-
ईडीने खेळीमेळीच्या वातावरणात माझी चौकशी केली- प्रताप सरनाईक
3 कोटी काय अद्याप 1 रूपयाही खर्च केला नाही; धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण
शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात ‘तुकडे-तुकडे गॅंग’-रविशंकर प्रसाद
‘कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबा पण…’; सुधीन मुनगंटीवार अधिवेशनात आक्रमक
पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे याचं निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास