महाराष्ट्र मुंबई

ऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगणाचं संजय राऊतांवर टीकास्त्र; म्हणाली…

मुंबई | काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगणा राणावत यांच्यात जुंपली होती. यानंतर आता कंगणानं दसऱ्यानिमित्त तिच्या मुंबईतल्या कार्यालयाचा फोटो ट्विट करत राऊतांवर पुन्हा टीकास्त्र सोडलंय.

कंगणा राणावतने ट्विटरवर हनुमानाच्या मूर्तीचा आणि मुंबईतल्या कार्यालयाचा फोटो शेअर केला आहे. तसेच माझी तुटलेली स्वप्नं तुमच्या चेहऱ्यासमोर हसत आहेत संजय राऊत, असं कंगणा राणावत म्हणाली आहे.

पप्पू सेना माझं घर तोडू शकते. पण माझ्या आत्म्यावर घाला घालू शकत नाही, असं कंगणाने म्हटलं आहे. बंगला क्रमांक 5 आज सत्याचा असत्यावर विजय साजरा करत आहे, असं कंगणाने म्हटलंय.

दरम्यान, कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालयावर महापालिकेनं कारवाई केल्यावर कंगणानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर घणाघाती टीका सुरू केली.

महत्वाच्या बातम्या-

“…तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही”

कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके मुख्यमंत्री कोत्या मनाचे नाही- संजय राऊत

आरक्षणाच्या मुद्द्यावर कंगणा राणावतने मांडलं मत, म्हणाली…

चीनशी लढा देण्यासाठी आपल्याला ताकद आणखी वाढवावी लागणार- मोहन भागवत

“आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या