बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् तसं झालं तर ठाकरे सरकार देखील पडू शकतं- कंगणा राणावत

मुंबई | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणावर अभिनेत्री कंगणा राणावतने प्रतिक्रिया दिली आहे.

कंगणाने या संदर्भात एक ट्विट केलं आहे. कंगणाने सचिन वाझे यांच्या अटकेनंतर या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. माझा अनुभव मला सांगतोय या प्रकरणात मोठं षडयंत्र रचलं जात आहे, असा संशय कंगणा राणावतने व्यक्त केला आहे.

शिवसेना सत्तेत आल्यानंतरच या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. जर या प्रकरणाचा योग्य तपास केला गेला तर आरोपी नक्कीच सापडतील अन् तसं झालं तर शिवसेनेचं सरकार देखील पडू शकतं, असं कंगणा राणावतने म्हटलं आहे. तसेच माझ्याविरोधात आणखी 200 गुन्हे लागू शकतात. याची मानसिक तयारी देखील मी केली आहे, असं ट्विट कंगणा राणावतने केलं आहे.

दरम्यान, सचिन वाझें अटक केल्यानंतर भाजप आणखी आक्रमक झाला आहे. या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजप नेते राम कदम यांनी केली आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

.‘स्फोटकांची कार लावण्यात सचिन वाझेंचा थेट सहभाग’; NIAचे वाझेंवर गंभीर आरोप

अभिनेत्री सायली संजीवचा बोल्ड अंदाज, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

सचिन वाझेंनंतर ठाण्यातील एका नेत्याची चौकशी होणार?

“सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे”

राजस्थानवरून आलेल्या त्या 180 वऱ्हाड्यांनी वाढवलं पालघरचं टेंशन; इतक्या जणांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More