महाराष्ट्र मुंबई

इतिहासात अर्णबला हिरो म्हणून ओळखलं जाईल- कंगणा राणावत

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पोलीस आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. यानंतर अर्णबच्या समर्थनार्थ अभिनेत्री कंगणा राणावत पुढे आली आहे.

अर्णब गोस्वामी यांना जितकं टॉर्चर केलं जाईल ते तिकडे कणखर होऊन बाहेर येतील असं कंगणा राणावतने म्हटलं आहे. तिने या संदर्भात एक व्हीडिओ ट्विट केला आहे. तसेच इतिहासात अर्णब यांना हिरो म्हणून ओळखलं जाईल असंही कंगणा म्हणाली आहे.

बॉलिवूडमधील ड्रग्ज माफीया, चाईल्ड ट्रॅफिकिंग आणि सोनिया गांधी यांचं खरं नाव घेतल्यामुळे टॉर्चर केलं जात असल्याचं कंगणा राणावतने म्हटलं आहे.

दरम्यान, अन्वय नाईक प्रकरणात महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामीविरोधात केलेल्या कारवाईवरही कंगणाने प्रश्नचिन्ह उपस्थित  केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

अन्वय नाईकप्रकरण आधीच्या सरकारने दाबलं- जयंत पाटील

‘…तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही सोडणार नाही’, मराठा आंदोलकांचा इशारा

“मराठा आरक्षणासाठी बुद्धिवंत लोकांची समिती स्थापन करा”

“सुशांत सिंह बद्दलची भावना भाजप नेत्यांना अन्वय नाईक यांच्याबद्दल का वाटत नाही?”

“शाहू महाराजांनी 200 वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, आज मराठा समाजाला का नाही?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या