महाराष्ट्र मुंबई

कंगणा राणावतने जो बायडन यांना दिली गजनीची उपमा, म्हणाली…

मुंबई | अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी दणदणीत विजय मिळवला. यानंतर जगभरातील नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र अभिनेत्री कंगणा राणावतने बायडन यांच्या विजयांनंतर ट्विट करत जो बायडन यांच्या विजयाची खिल्ली उडवली आहे.

कंगणाने बायडन यांना गजनीची उपमा दिली आहे. गजनी बायडन यांच्याबद्दल मी पूर्णपणे आश्वस्त नाही. ज्यांचा डाटा प्रत्येक 5 मिनिटाला क्रॅश होतो, असं कंगणाने म्हटलंय.

इतक्या औषधांचे इंजेक्शन त्यांच्यात इंजेक्ट केले गेलेत की, ते एक वर्षांपेक्षा अधिक काळ टिकू शकणार नाहीत. त्यामुळे कमला हॅरीस याच शो पुढे नेतील, हे स्पष्ट आहे, असं ट्विट कंगणा राणावतने केलं आहे.

दरम्यान, एक महिला पुढे जाते, तेव्हा आपल्यासोबत ती अन्य महिलांसाठीही मार्ग तयार करते. या ऐतिहासिक दिवसासाठी चीअर्स, असं कंगणा राणावतने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीनंतरचे 15 दिवस अत्यंत कसोटीचे असणार- उद्धव ठाकरे

कुणाच्याही टीकेची पर्वा न करता मुंबईकरांच्या हितासाठी कामं करणारच- उद्धव ठाकरे

रोषणाई करा, फराळ बनवा, पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका- उद्धव ठाकरे

राष्ट्राध्यक्षपद गेलं; आता बायकोही सोडून जाण्याच्या तयारीत?

पवार साहेब फॅक्टर अमेरिकेतही यशस्वी; बायडेन यांच्या विजयानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या