बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका- कंगणा राणावत

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. यावर अभिनेत्री कंगणा राणावतने टीका केली आहे.

आंदोलक शेतकऱ्यांना जेलमझध्ये टाका आणि त्यांची संपत्ती जप्त करा, असं कंगणा राणावतने म्हटलं आहे.

मित्रांनो आपण बघत आहोत की, कशाप्रकारे आज प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला. तिथे खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे, असं म्हणत कंगणाने आंदोलक शेतकऱ्यांवर सडकून टीका केलीये.

लाल किल्ल्याचे फोटो येत आहेत. हे दहशतवादी जे स्वत: ला शेतकरी म्हणतात त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. सर्वांसमोर हा तमाशा सुरु आहे, अशी टीका कंगणाने केलीये.

 

थोडक्यात बातम्या- 

सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का?- संजय राऊत

संतप्त शेतकऱ्यांमध्ये अडकला होता पोलीस कर्मचारी, मदतीसाठी एक शेतकरीच धावला!

रेणू शर्माने बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हिंसेनं कोणत्याही समस्या सुटू शकत नाही- राहुल गांधी

धक्कादायक! आंदोलनकर्त्यांचा पोलिसांवर तलवारी घेऊन हल्ल्याचा प्रयत्न, एक पोलीस जखमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More