बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदीजी, पृथ्वीराज चौहान यांनी केेलेली ‘ती’ चूक तुम्ही करू नका- कंगणा राणावत

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावतने ट्विटरविरोधात मोहिम छेडली आहे. कंगणा राणावतने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर कठोर कारवाई करत, त्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

आदरणीय पंतप्रधान, जी चूक महान योद्धा पृथ्वीराज चौहान यांनी केली होती ती तुम्ही अजिबात करू नका. त्या चुकीचं नाव होतं माफी. ट्विटर कितीही वेळा क्षमा मागेल पण क्षमा करू नका. त्यांनी भारतात गृहयुद्धाचा कट रचला होता, असं ट्विट कंगणा राणावतने केलं आहे.

कंगणा राणावतने शेतकरी आंदोलनाला विरोध करत अनेक वादग्रस्त ट्विट्स केले होते. या वादग्रस्त ट्विट्सपैकी काही ट्विट्स ट्विटरने डिलीट केले होते. यानंतर कंगणा राणावत भडकली आहे.

तुम्हाला कोणी चीफ जस्टिस बनवलं? अनेकदा तुम्ही पण गटबाजी करता आणि मग त्रासदायक हेडमास्तर बनता. अनेकदा तर स्वत:ला पंतप्रधान समजता. काही नशेबाजांचे गट तुम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत कंगणा राणावतने ट्विटरवर निशाणा साधला होता.

थोडक्यात बातम्या-

‘माझी पक्षात घुसमट होतीये’; ‘या’ खासदाराची राज्यसभेत राजीनाम्याची घोषण

ग्विन पहायला 16 फेब्रुवारीपासून याचचं हं, पण खबरदार जर…”

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

…म्हणून त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं!

कुख्यात गुंड अरुण गवळीची प्रकृती खालावली; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More