बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘2024 ला पण तुम्हीच पंतप्रधान…’; अभिनेत्री कंगणा राणावतच्या मोदींना खास शुभेच्छा

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. नरेंद्र मोदींना देशभरातून सर्वजण शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री कंगणा राणावतनेही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. कंगणाने एक पोस्ट करून स्टोरी ठेवली आहे. विशेष म्हणजे कंगणाने प्रभू श्रीराम यांचा एक फोटो एडिटही केला आहे.

तुम्ही 2024 मध्येही पंतप्रधान व्हावं आणि देशाची सेवा करावी, असं कंगणाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कंगणाने स्टोरीला जो फोटो ठेवला आहे त्यामध्ये प्रभू श्रीराम मोदींच्या खांद्यावर हात ठेवलेले दिसत आहेत.

पंतप्रधानांचा वाढदिवस हा देशासाठी एक शुभ दिवस आहे. एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याची खरी कसोटी ती मोदीभक्त आहे की विरोधक आहे. जर तो भक्त असेल तर ती व्यक्ती राष्ट्रवादी आहे आणि जर तो द्वेष करणारा असेल तर तो निश्चितच राष्ट्रविरोधी तुकडे टोळीशी संबंधित आहे. तुम्ही भारताला गमावलेले वैभव, संस्कृती, संपत्ती आणि मूल्ये परत आणा, असं कंगणाने म्हटलं आहे.

दरम्यान, याआधी कंगणाने अनेकवेळा पंतप्रधान मोदींच्या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यासोबतच सर्वात बेस्ट पीएम हे मोदीच असल्याचं कंगणा म्हणाली होती. कंगणाची ही पोस्ट सोशल माध्यमांवर व्हायरल झाली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

थोडक्यात बातम्या- 

बीडमधील ह्रदयद्रावक घटना, कोरोनामुळे पतीच्या निधनानंतर पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल!

“दानवे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष होते, तेव्हा सर्व काही सुरळीत होतं”

ऐनवेळी आली ‘ती’ गुप्त खबर अन् पाकिस्तानात असलेल्या न्यूझीलंडने घेतला परतण्याचा निर्णय

सावधान! कोरोनामधून बरे झालेल्या लोकांमध्ये ‘या’ आजाराचा धोका वाढतोय

…म्हणून ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी मागितली जाहीर माफी, पाहा व्हिडीओ!

…तरच पैसे मिळतील, जे काय करेल ते सरळ करेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More