Top News मनोरंजन

हृतिक, एका छोट्याशा अफेअरवर किती वर्ष रडशील- कंगणा राणावत

मुंबई | सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणा राणावतच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अभिनेता हृतिकने कंगणा विरोधाक एक एफआयआर दाखल केली होती. सध्या हे प्रकरण सायबर सेलकडून क्राइम ब्रान्च इन्टेलिजेन्स युनिटकडे देण्यात आलं आहे.

हृतिकच्या वकिलांनी मुंबई आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी केली असल्याची माहिती आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कळतंय. यावर कंगणाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते, तो पुन्हा तेच सर्व नाटक सुरू करतो. हृतिक रोशन, एका छोट्याशा अफेअरवर किती वर्ष रडशील, असं कंगणाने म्हटलं आहे.

दरम्यान, रडण्याची कहाणी पुन्हा सुरू झाली आहे. आमच्या ब्रेकअपला आणि त्याच्या घटस्फोटाला किती वर्षे झाली. पण तो पुढे जाण्यास तयार नाही. कोणत्याही महिलेला डेट करायलाही तयार नसल्याचं कंगणाने म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पृथ्वी शॉच्या अफलातून लेग स्पिनने सर्वांना झाली शेन वॉर्नची आठवण; पाहा व्हिडीओ

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला’; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

आईची शपथ घेऊन सांगतो; भर सभागृहात मुनगंटीवारांना का घ्यावी लागली शपथ???

‘चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’; भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या