Top News मनोरंजन

‘महिलांना फक्त सन्मान आणि प्रेमाची गरज तुमच्या पगाराची नाही’; कंगणाचा शशी थरूर यांच्यावर निशाणा

मुंबई | कमल हासन यांच्या महिलांबाबतच्या वक्तव्याचं समर्थन करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी हासन यांच्या विचारांचं आपण स्वागत करत असल्याचं म्हटलं. यावरून बॉलिवूड आणि प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावतने थरूर यांच्यावर निशाणा साधला आहे.

घरामध्ये काम करणाऱ्या महिलांना सन्मान आणि घरकाम करणाऱ्या महिलांना शासनाने मासिक पगार द्यायला पाहिजे म्हणजे त्यांनाही प्रोत्साहन मिळेल, असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात थरूर यांनी ट्विट केलं आहे. याचाच धागा पकडत कंगणाने थरूर यांच्या ट्विटवरून टीका केली.

महिलांच्या प्रेमावर टॅग लावू नका. प्रत्येक गोष्टीत व्यवसाय पाहू नका. महिलांना फक्त सन्मान आणि प्रेम द्या. त्यांना फक्त तुमच्या सन्माची आणि तुमच्या प्रेमाची गरज आहे पगाराची नसल्याचं कंगणा राणावतने म्हटलं आहे.

दरम्यान, कंगणाच्या टीकेवर शशी थरूर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! शीर कापलेल्या नग्न अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह

‘शिवसेना नव्हे ही तर औरंगजेब सेना’; भाजपचा सेनेवर निशाणा

हिवरेबाजार, राळेगणसिद्धीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची 30 वर्षांची परंपरा खंडित

ड्रग प्रकरणी एनसीबीने ‘या’ अभिनेत्रीला केली अटक!

“शिवसैनिक झालाय गरीब-बापडा, सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या