मणिकर्णिका आणि ठाकरे आमने-सामने; भल्याभल्यांशी पंगा घेणारी कंगणा म्हणते…

मुंबई | झाशीच्या राणीच्या आयुष्यावर आधारित मणिकर्णिका आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे दोन्ही सिनेमांमध्ये जोरदार टक्कर आहे.

अभिनेत्री कंगणा राणावत मणिकर्णिका सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. तीने चित्रपटाच्या तारखेसंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

चित्रपटाची तारिख बदलण्यासाठी आपल्याला कुणाचाही दबाव आलेला नाही, किंवा ठाकरे सिनेमाच्या कुणीही संपर्क साधला नाही, असं कंगणानं म्हटलंय.

दरम्यान, दोन्ही सिनेमे २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहेत. एकाच दिवशी प्रदर्शित होऊनही दोन्ही सिनेमे दमदार कामगिरी करतील, असं कंगणानं म्हटलंय. 

महत्वाच्या बातम्या-

-विजयी भव:; झाशीच्या राणीची वीरश्री दाखवणारं गाणं, पाहा व्हीडिओ- 

-मंचावर होते काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीचे नेते; इंदूरीकर म्हणाले, मी सगळ्या पक्षांचा निष्ठावान!

-“मोदीजी, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरापासून सुरू होतो”

-आरक्षण दिलं, पण नोकऱ्यांचं काय, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल

-आज सरकार विरोधात राष्ट्रवादीचा रायगडावरून तर काँग्रेसचा दिक्षाभूमीवरून यल्गार