बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चोर ज्यांना घाबरतात त्यांना नरेंद्र मोदी म्हणतात’; कंगणाचं तापसी आणि अनुरागवर टीकास्त्र

मुंबई | केंद्र सरकारविरोधात बोलणारे कलाकार अभिनेत्री तापसी पन्नू आणि बॉलिवुडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याकडे आयकर विभागाने आपला मोर्चा वळवलेला दिसत आहे. आयकर विभागाच्या पथकांनी कश्यप आणि पन्नूच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे टाकले आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगणा राणावतने अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात कंगणाने ट्विट केलं आहे.

चोर फक्त चोरच असतात पण जे मातृभूमीला विकून त्याचे तुकडे करतात ते गद्दार असतात. जे गद्दारांना मदत करतात तेही चोरच असतात. चोर-चोर मावस भाऊ असतात आणि चोरांना ज्यांची भीती वाटते ते साधारण मानव नाही तर त्यांना नरेंद्र मोदी म्हणतात, असं कंगणाने म्हटलं आहे.

मिनिटा मिनिटाला हा आकडा वाढत आहे हेच ते पैसे आहेत. ज्यांचा क्लू मिळाला आहे विचारही करू शकत नाही, की मनी लॉन्ड्रिंगचा खरा आकडा काय आहे. या तुकडे-तुकडे गँगच्या दहशतवादावरुन पडदा बाजूला होत आहे. हे फक्त करचोर नाहीत तर दहशतवादी असल्याचंही कंगणा म्हणाली.

दरम्यान, तापसी पन्नु आणि अनुराग कश्यप यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तापसी पन्नुच्या घरून अधिकाऱ्यांना 5 कोटी रूपयांच्या रोख व्यवहाराच्या पावत्या मिळाल्या आहेत आणि अनुराग कश्यपच्या चौकशी नंतर 20 कोटी रूपयांचे कर चुकवल्याचे पुरावे मिळाले आहेत. एकुण 350 कोटी रूपयांचा कर चुकवल्याचा संशय आयकर विभागातील अधिकाऱ्यांना आला आहे. त्यानुसार कडक चौकशीही सुरू आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

“मी फोटो पाहिलेत, हात बांधून कोणी आत्महत्या करत नाही”

आमदार अरुण लाड यांनी विधानपरिषदेत पदवीधारकांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी

देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचं म्हणणाऱ्याला अटक

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात ‘कोरोना’चा उद्रेक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More