बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रतिक रोशनने आर्यनला दिलेल्या पाठिंब्यामुळं कंगना भडकली; म्हणाली…

मुंबई | एनसीबीने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. त्यानंतर बॉलिवूड मधील कलाकार आर्यनच्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत. आज गुरूवारी बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनने माय डियर आर्यन खान, जीवन हा एक विचित्र प्रवास आहे, अशी स्टोरी शेअर केली होती.

या सर्व प्रकरणात आता अभिनेत्री कंगना राणावतने उडी घेतली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. आता सगळे पप्पू माफिया आर्यन खानला पाठिंबा देत आहेत. तसेच आपण चुका करतो हे अभिमानाने सांगु नये, असं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगना राणावतने म्हटलं आहे. ह्रतिक रोशनने पोस्ट केल्यानंतर कंगनाने पोस्ट केल्याचं बोलल जात आहे.

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये कंगनाने आर्यन खानला काही सल्लेही दिले आहेत. आर्यनला त्याने केलेल्या कृतीची जाणीव होईल. आर्यनच्या विरोधात जे पाऊल उचलले जात आहे त्यातुन त्याला धडा शिकायला भेटेल, असं कंगना म्हणाली आहे.

दरम्यान, आपण ज्या चुका करतो त्या अभिमानाने सांगू नये. तसेच मला अपेक्षा आहे की, आर्यन खान बाहेर पडल्यानंतर तो एक चांगला व्यक्ती असेल, असं कंगना राणावतने म्हटलं आहे. तसेच ह्रतिक रोशनने पोस्टमध्ये म्हटलं होत की, ईश्वर फार द्याळू आहे. तो कणखर व्यक्तींनाच कठीण चेंडू खेळण्याची संधी देतो, असं आर्यन खानला उद्देशून ह्रतिक रोशनने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

भर सामन्यात दीपकने फोडली लग्नाची सुपारी, प्रेयसीला केलं प्रपोझ, पाहा व्हिडीओ!

क्लासी राहुलच्या वादळी खेळीने पंजाबच्या आशा पुन्हा जिंवत; तब्बल ‘इतक्या’ षटकारांची केली आतषबाजी!

वरूण गांधींना मोठा धक्का! शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं कार्यकारिणीतून डच्चू

‘अजित पवारांच्या कंपन्यांवर टाकलेल्या धाडीवरून स्पष्ट होतं की…’; मलिकांचा गंभीर आरोप

“उद्धवजींची बोली अन् बंदुकीची गोळी एकसारखीच, त्यांचा आदेश आला की…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More