‘आता परत कधीच तो…’; कंगनाची उद्धव ठाकरेंवर टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबद्दल सर्वात महत्त्वाचा निकाल जाहीर केलाय. शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला देण्यात आलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Eknath shinde) यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातोय. या मोठ्या निकालावर कंगणा रनौतने प्रतिक्रिया दिली आहे.

देवतांचा राजा इंद्रसुद्धा दुष्कर्म केल्यावर स्वर्गातून खाली पडतात, मग हा तर फक्त एक नेता आहे, जेव्हा त्याने माझे घर अन्यायाने तोडले होते, तेव्हाच मला समजलं होतं की लवकरच त्याची सत्ता जाईल, असं कंगना म्हणालीये.

देवता चांगल्या कर्मांनी पुन्हा वर जाऊ शकतात, परंतु स्त्रीचा अपमान करणारे लोक कधीच पुन्हा वर उठू शकत नाही, आता परत कधीच तो या परिस्थितीतून वर येऊ शकणार नाही, असं ट्वीट कंगना राणौतने केलं आहे.

कंगनाने ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे, पण तिने त्यांचा उल्लेख केलेला नाही. यावेळी मुंबईतील तिच्या घरावर कारवाई करण्यात आली होती, त्याचा संदर्भ कंगनाने यावेळी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-