बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कंगणा पुन्हा प्रेमात?,मिठी मारलेला फोटो कुणाचा?, बड्या नेत्याच्या नावाची चर्चा

मुंबई | आपल्या वादग्रस्त विधानावरून सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगणा रनौत ( Kangana Ranaut) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी तीने कुठलंही वादग्रस्त विधान केललं नाही. तर ती यावेळी तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून चर्चेत आली आहे. कंगणाने इन्टाग्रामवर 1 रोमँटीक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ती एका व्यक्तीच्या प्रेमात असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

कंगणाने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये तिने एक ॲनिमेटेड फोटो शेअर करत त्याखाली ‘तेरे लिए हम है जिए. कितने सितम हमपे सनम’ असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. कंगणाने नेमकी ही पोस्ट कोणासाठी केली आहे ? ती कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे का? असे प्रश्न सध्या नेटकरी विचारत आहेत.

 

Photo Courtesy-Instagram

 

कंगणा ही यापूर्वी ऋतिक रोशन सोबत रिलेशन मध्ये होती. मात्र, त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाल्याने ते वेगळे झाले. त्यावेळीही कंगणा आणि ऋतिक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. कंगणाने त्यावेळी ऋतिक रोशनवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता कंगणा पुन्हा एकदा एका बड्या नेत्याच्या प्रेमात असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि वादग्रस्त विधान हे जुनं समीकरण आहे. कंगना रनौत तिच्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेचा विषय असते. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यावरही कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादांना तोंड फुटलं. शेतकऱ्यांची तुलना खलिस्तान्यांसोबत केल्यामुळे कंगनाविरोधात अनेक ठिकाणी एफआयआर नोंदवण्यात आला होता.

 

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारचे तीन नवे नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर; लवकरच करणार खुलासा

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, तब्बल एवढ्या गावात झालं 100% लसीकरण

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात, ‘या’ वादळी मुद्द्यांवर होणार चर्चा

परमबीर सिंह हाजीर हो! सिंह अखेर चांदीवाल समिती समोर लावणार हजेरी

‘या’ ॲपद्वारे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत करता येणार शेती मालाची विक्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More