Top News मनोरंजन

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कंगणा भडकली, म्हणाली…..

मुंबई | स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिने काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. यावर तिने त्वरित माफिनामाही दिला. मात्र यावर अजूनही प्रतिक्रिया येत असून आता बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

टीम कंगणा राणावत या ट्विटर हॅन्डलवरून, या सर्व प्रकारावर पोस्ट केलेल्या एका उपहासात्मक व्हिडिओसोबत कमेंट करण्यात आलीये. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा संदर्भ देत कॉमेडियन्सवर भाष्य करण्यात आलंय. ज्यांना दोन पैशांचीही किंमत नाही, ज्यांना कुणी विचारतंही नाही अशी लोकं हुतात्म्यांवर विनोद करतायत, हे योग्य नाही. कुणीही हुतात्म्यांवर विनोद करू नयेत. आपल्या देशांतील हिरोंसंदर्भात विनोद करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात कायदे असणं आवश्यक आहे, असं कंगणा म्हणाली आहे

कॉमेडिअन जोशुआने झालेल्या वादासंदर्भात माफी मागितल्यानंतर तिला बलात्काराची धमकी देण्यात आली. यासंदर्भातील व्हिडिओ एका तरुणाने पोस्ट केला होता. यानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही या तरुणाला अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर त्याला वडोदरा पोलिसांनी अटकही केली.

याच प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. यासंदर्भात मनसेचे कार्यकर्ते यश रानडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर जोशुआचा स्टुडिओत तोडफोड केल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तसंच दुसऱ्या पोस्टमध्ये अग्रिमा जोशुआ हिने लेखी माफी मागितल्याचंही सांगण्यात आलंय.

महत्वाच्या बातम्या-

समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण; दिसत असेल तर लगेचच हाॅस्पिटल गाठा!

‘नया है वह’ म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

“ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा…..”

एअर इंडियाचा मोठा निर्णय; पाच वर्षांसाठी कर्मचाऱ्यांना पाठवणार विना पगारी सक्तीच्या रजेवर

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या दुपारी ‘या’ तीन वेबसाईटवर पाहता येणार निकाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या