‘घरात घुसून मारलं होतं ना?’, कंगना रनौतने पुन्हा करण जोहरला डिवचलं
मुंबई। बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिगदर्शक म्हणून करण जोहरची (Karan Johar) ओळख आहे. करण जोहरचा टेलिव्हिजनवरील टॉक शो ‘कॉफी विथ करण’ जितका लोकप्रिय आहे तितकाच वादग्रस्त देखील आहे. करणचा या लोकप्रिय टॉक शोमध्ये फिल्म इंडस्ट्रीमधील वेगवेगळ्या कलाकारांनी आतापर्यत हजेरी लावली आहे.
कॉफी विथ करणच्या पाचव्या सिझनमध्ये अभिनेत्री कंगना रनौतला (Kangna Ranuat) आमंत्रित केलं होतं. मात्र, त्यानंतरपासून करणचा आणि कंगनाचा 36 चा आकडा आहे हे सर्वांनाच माहित आहे. ‘कॉफी विथ करण’चा 7वा सिझन ओटीटवर आला असून कंगनाने पुन्हा एकदा करणवर टीका केली आहे.
पापा जो आज OTT वर त्याचा टॉक शो ‘कॉफी विथ करण’च्या लोकप्रिय एपिसोडची जाहिरात करत आहे. पापा जो ला त्याच्या या शोसाठी शुभेच्छा, पण या एपिसोडचं काय, माफ करा, सर्जिकल स्ट्राईक घरात घुसून मारलं होतं ना. माझा एपिसोड हा त्याचा सर्वात लोकप्रिय एपिसोड होता आणि त्यानंतर त्याचा हा शो टेलिव्हिजन वर बंद करण्यात आला, असं कंगना सिझन 5 मधील तिचा फोटो शेअर करत म्हणाली आहे.
दरम्यान, ‘कॉफी विथ करण’च्या 5व्या सिझनमध्ये कंगनाने करणवर बॉलीवूडमध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन देण्याचा आरोप लावला. सध्या या शोचा 7वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट व रणवीर सिंग यांनी हजेरी लावली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…तर नव्या चिन्हाचीही तयारी ठेवा’, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आणखी खालावली, महत्त्वाची माहिती समोर
मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट, शिंदे गटाच्या आमदारांना राग अनावर
Comments are closed.