मुंबई | जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या घटनेचा निषेध म्हणून बाॅलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने काल विद्यार्थ्यांच्या समर्थनात जेएनयूत हजेरी लावली. याचे पडसाद ट्विटरवर उमटत असून एकीकडे ‘दीपिकाच्या चित्रपटावर बहिष्कार टाका’ असा ट्रेंड सुरु झाला आहे तर दुसरीकडे तिला जोरदार पाठिंबा मिळत आहे. यावर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणाावतने एका व्हिडीओच्या माध्यमातून ‘छपाक’ला जाहीर पाठिंबा दिला आहे.
कंगना सध्या तिचा आगमी सिनेमा ‘पंगा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र तरीही तिनं दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’चं कौतुक केलंय. ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत दीपिका आणि मेघना गुलजार यांना कंगनाने शुभेच्छा दिल्या आहे. याशिवाय याआधी कंगनाची बहिण रंगोलीनं सुद्धा ‘छापाक’ ट्रेलर रिलीज झाल्यावर दीपिकाचं कौतुक केलं होतं.
मी छपाक सिनेमाचा ट्रेलर पाहिला. हा ट्रेलर पाहिल्यावर मला माझी बहीण रंगोलीची आठवण आली. तिच्यासोबत घडलेला तो अपघात तिच्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या, असं कंगना आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.
दरम्यान, जेएनयू प्रकरणी नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. छपाक सिनेमावर बंदी आणावी यासाठी सोशल मीडियावर दीपिका विरोधात ट्रोलिंग सुरू झालं आहे.
The pain still lingers. Our family thanks team #chhapaak for a story that needs to be told! @deepikapadukone @meghnagulzar @foxstarhindi pic.twitter.com/drKN3i6GSP
— Rangoli Chandel (@Rangoli_A) January 8, 2020
Wow!!! Everyone should see this film, amazing @meghnagulzar @TheLaxmiAgarwal @deepikapadukone @foxstarhindi 👏👏👏👏” https://t.co/33FEq3Eyq2 via @YouTube
— Rangoli Chandel (@Rangoli_A) December 10, 2019
संबंधित बातम्या-
एकीकडे दीपिकाच्या चित्रपटावर बहिष्कार तर दुसरीकडून मिळतोय जोरदार पाठिंबा
जेएनयूमध्ये हजेरी लावत दीपिका पादुकोणने दिला विद्यार्थ्यांना पाठिंबा
“देशातील विद्यार्थी असुरक्षित आणि अन्य देशांतील अल्पसंख्याकांना संरक्षण द्यायला निघालात”
महत्वाच्या बातम्या-
पहिल्याच कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारचा भाजप आमदाराला दणका https://t.co/vbEBD1HM6v @BJP4Maharashtra @ShivSena @OfficeofUT @Dev_Fadnavis #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 8, 2020
आव्हाडांचा बंगला वडेट्टीवारांना बहाल, तरीही नाराजी कायम! – https://t.co/f2h6sEKDJY @INCMaharashtra @NCPspeaks #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 8, 2020
सर्वकाही ठिक आहे असं भासवणं बदं करा- आलिया भट्ट https://t.co/hDhM2JAveu @aliaa08 #म #JNUViolence
— थोडक्यात (@thodkyaat) January 8, 2020
Comments are closed.