Kanhaiya Kumar | जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील आंदोलनानंतर कन्हैया कुमार देशात चर्चेत आला.आता तो लोकसभेच्या मैदानात देखील उतरला आहे. कॉँग्रेसकडून कन्हैया कुमारला उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातून तिकीट मिळालं आहे. अशात दिल्लीमधील एका रॅलीदरम्यान त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या घटनेचा व्हिडिओ हल्लेखोरांनीच सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कन्हैया कुमारला पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने एक व्यक्ती जवळ आला आणि त्याला चापट मारायला लागला.त्याने कन्हैयावर शाई देखील फेकली.
कन्हैया कुमारवर हल्ला
व्हिडिओमध्ये असं दिसतंय की, दाढी वाढवलेला एक तरुण फुलांची माळ गळ्यात घालण्याच्या बहाण्याने कन्हैयाजवळ (Kanhaiya Kumar) जातो. माळ घातल्यानंतर तो थेट त्याच्या कानशिलात लगावतो. तर दुसरा तरुण शाई फेकतो. कानशिलात लगावणाऱ्या तरुणाचे नाव दक्ष चौधरी असल्याचे समोर आलं आहे. हा दावा काही मीडिया रिपोर्टने केला आहे.
हल्ल्यानंतर दोन व्हिडिओ करण्यात आले
हल्ला करणाऱ्यांनी कन्हैया कुमारचे (Kanhaiya Kumar) दोन व्हिडिओ तयार केले. हल्ला करण्याच्या अगोदर आणि त्यानंतर आरोपींनी व्हिडिओ तयार केला. हल्ला करण्यापूर्वी ‘कन्हैया आता फटके खाणार’ असा व्हिडिओ आरोपींनी तयार केला होता.नंतर त्याच्या कानाखाली वाजवल्यानंतर अजून एक व्हिडिओ तयार करण्यात आला.
“ज्या कन्हैया कुमारने भारताचे तुकडे करु हजार आणि अफजल आम्हाला लाज वाटते, तुझे मारेकरी जीवंत आहेत, अशा घोषणा दिल्या, त्याला आम्ही दोघांनी कानशिलात लावून उत्तर दिले आहे.”, असं हल्लेखोर बोलताना दिसून आले.
“जोपर्यंत आमच्यासारखे तरुण आहेत, सनातनी जीवंत आहेत, तोपर्यंत भारताचे कोणीच तुकडे करु शकत नाही”, असा दावा या व्हिडिओत या दोन तरुणांनी केला. इतकंच नाही तर, त्यांनी भारत माता की जय, भारतीय लष्कराचा विजय असो, गोमाता की जय, जय श्रीराम असा जयघोषही या व्हिडिओमध्ये केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Bravo Daksh Who Slapped Traitor #KanhaiyaKumar 🦁 pic.twitter.com/LhFwT6MsV4
— Sadhvi Prachi (मोदी का परिवार) (@Sadhvi_prachi) May 17, 2024
News Title – Kanhaiya Kumar was attacked by two youths
महत्त्वाच्या बातम्या-
गरोदरपणात महिलांचा आहार कसा असावा, जाणून घ्या ICMR ची मार्गदर्शक तत्त्वे
घराचं स्वप्न महागलं; ‘या’ प्रमुख शहरांमध्ये घराच्या किंमतीत वाढ
‘तारक मेहता…’ मधील सोढी अखेर घरी परतला; एवढ्या दिवस कुठे होता?, धक्कादायक खुलासा समोर
विराट कोहलीच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर; ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल
जबरदस्त आणि आकर्षक टीव्हीएस कंपनीची ब्लॅक एडिशन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत