लखनऊ | जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी नेता कन्हैय्या कुमार हे भाकपच्या समर्थनावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाकपच्या एका कार्यकर्त्याची अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे.
फागो तांटी असं त्या कार्यकर्त्याचं नाव आहे. तो एक गरीब शेतकरी होता. मतीहानी पोलीस हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.
पाचरुखी बहियार येथून परतत असताना त्याचे अपहरण झाले, असा आरोप मृत व्यक्तीच्या भावाने केला आहे. या घटनेवरुन परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
‘हम लेके रहेंगे आझादी’ अशी घोषणा लिहलेला लाल रंगाचा शर्ट त्याने घातला होता, असं पोलिसांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
-महाराष्ट्रात युतीला 42 पेक्षा जास्त जागा मिळतील- रावसाहेब दानवे
-समलैंगिक असल्याने द्युती चंदला तिच्या बहिणीने घरातून बाहेर काढण्याची दिली धमकी
-विधानसभेची तयारी पुढील महिन्यापासून- रोहित पवार
-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 24 ते 25 जागा मिळतील; अशोक चव्हाण यांचा दावा
-वृत्तवाहिन्यांवर निर्बंध आणण्यासाठी कायदा करणार- कुमारस्वामी
Comments are closed.