कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहापकरणी आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली | जेएनयू प्रकरणात कन्हैय्या कुमार, उमर खालीद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्या विरोधात देशद्रोहाप्रकरणी सोमवारी आरोपपत्र दाखल केले आहे. 

संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरुला फाशी देण्यावरुन जेएनयूमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर याठिकाणी भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी याप्रकरणी कन्हैय्या कुमारसह इतरांना अटक देखील केली होती. यावरुन भाजपवर मोठी टीकेची झोड उठली होती. समोर आलेल्या क्लीपमध्ये छेडछाड केल्याचा आरोप झाला होता.

आरोपपत्रातील ७ काश्मिरी विद्यार्थ्यांची चौकशी यापूर्वीच करण्यात आली आहे.

दरम्यान, कन्हैय्या कुमारसह इतर 10 प्रमुख आरोपींवर देशद्रोही, दंगल भडकवणे, अवैध प्रकारे एकत्र येणे, असे आरोप लावण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“जे बाळासाहेबांचं स्मारक बांधू शकले नाहीत ते राम मंदिर काय बांधणार”??

-उत्तर प्रदेशमध्ये भाजपची चिंता वाढणार?; भीम आर्मीचा पाठींबा सपा,बसपाला

-अजय देवगणच्या नव्या लूकने आठवण करुन दिली ‘राजा रॅन्चो’ची

-भाजपकडून कर्नाटकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ सुरु- डी.के.शिवकुमार

-“साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच, कार्यकर्त्यांनो तयारीला लागा”!