Top News

“चौकीदार साहेबांच्या दररोज 20 तास काम करण्याने देश उद्ध्वस्त होतोय”

नवी दिल्ली |  चौकीदार साहेब दिवसातील 20 तास काम करत असल्याने देश उद्ध्वस्त होतोय, असं म्हणत विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

एअर इंडिया, बीएसएनएल, एचएएलनंतर आता भारतीय टपाल खात्याचीही परिस्थिती चिंताजनक झाली आहे.  टपाल खात्याला 15 हजार कोटींचा तोटा झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

हे उगाच घडत नाहीय. सुट्टी न घेता चौकीदार साहेब रोज 20 तास काम करतात, त्याचे हे फळ आहे, असं म्हणत कन्हैयाकुमार यांनी बोचरी टीका केली आहे.

दरम्यान, कन्हैयाकुमार बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

-“नरेंद्र मोदींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी इस्लामी देशांकडून फंडिंग”

-“देशासाठी बलिदान देणाऱ्या कुुटुंबासमोर नतमस्तक होण्यात गैर नाही”

-भीती वाटल्याने भाजपने उमेदवार बदलला; सुशीलकुमार शिंदेंचे टीकास्त्र

-हेलिकॉप्टर मधून हिरवागार झालेला महाराष्ट्र पाहिला- अमित शहा

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची निवडणुकीतून माघार; काँग्रेसला पाठिंबा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या