मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक

Darshan Thoogudeepa | मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दर्शन थुगुदीपा असं या अभिनेत्याचं नाव आहे. पोलिस आता या प्रकरणी अधिकचा तपास करत आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार, रेनुकास्वामी नावाच्या एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी दर्शन शूगुदीपा याला अटक करण्यात आली आहे. रेनुकास्वामी नामक व्यक्ती चित्रगुर्ग नावाच्या एका मेडिकल शॉपमध्ये काम करत होती.

कन्नड अभिनेत्याला अटक

तिचं नुकतंच लग्न देखील झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, रेनुकास्वामीचं मेडिकल शॉपमधून अपहरण करण्यात आलं. यानंतर शहाराच्या कामाक्षीपाल्या येथे तिची हत्या करण्यात आली. इतकंच नाही तर, हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची व्हिल्हेवाट लावण्यात आली.

मृत व्यक्तीच्या शरीरावर जखमांचे निशाण आढळून आल्याची माहिती आहे. या प्रकरणी अभिनेत्याला (Darshan Thoogudeepa) त्याच्या मूळ गावी असलेल्या म्हैसूरमधील चामराजेंद्र प्राणी उद्यानाजवळील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलंय.

कोण आहे दर्शन थुगुदीपा?

दर्शन थुगुदीपा (Darshan Thoogudeepa) हा कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते थुगुदीपा श्रीनिवास यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म 16 फेब्रुवारी 1977 रोजी कर्नाटकात झाला. वडिलांप्रमाणेच दर्शनचेही इंडस्ट्रीत मोठे नाव आहे. प्रोजेक्शनिस्ट म्हणून त्यांने आपल्या करिअरची सुरुवात केली.

यानंतर त्यांनी कॅमेरामनची जबाबदारी स्वीकारली. या काळात दर्शनने सिनेमॅटोग्राफर बीसी गौरीशंकर यांनाही मदत केली. 1997 मध्ये त्यांला ‘महाभारत’ चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेची ऑफर आली होती. यानंतर, अभिनेत्याने देवरा मागा आणि श्री हरिश्चंद्रसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती मॅजेस्टिक या चित्रपटातून.

News Title : Kannada Actor Darshan Thoogudeepa Detained 

महत्त्वाच्या बातम्या-

मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक, उपोषण थांबवण्यासाठी शरद पवारांचं मोठं पाऊल

‘मिर्झापूर 3’ वेबसिरीज संदर्भात मोठी अपडेट समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीज

‘थोडं थांबा…’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना गंभीर इशारा

“लोकसभेत सर्वात जास्त मेहनत घेऊन उद्धव ठाकरेंना काय मिळालं?”

“गोड बोलून माझा काटा काढण्याचा..”; मनोज जरांगेंचा अत्यंत गंभीर आरोप