देश मनोरंजन

…म्हणून या रॅपरला नेत्यांकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस!

Loading...

बंगळुरु | कर्नाटकमधील म्हैसूर येथे कन्नड रॅपर चंदन शेट्टीने सरकारी दसरा मेळाव्यात थेट आपली प्रेयसी निवेदिता गौडाला प्रपोज केलं. या प्रकरणावर नाराज म्हैसूर जिल्ह्याचे पालकमंत्री व्ही. सोमन्ना यांनी  पोलिसांकडून चंदन शेट्टीला सरकारी मंचाचा खासगी उपयोग केला म्हणून नोटीस पाठवली आहे.

रॅपर चंदन शेट्टीने शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात अचानक त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं. चंदनचा गुडघ्यावर उभा राहून प्रयसीला अंगठी देतानाचा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे आयोजक मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र चांगलेच संतापले.

Loading...

शेट्टीच्या या कृतीने आम्हालाही आश्चर्यचकित केलं. आम्हाला याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. त्याने आयोजकांना अंधारात ठेऊन हे केलं. याबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पालकमंंत्री व्ही. सोमन्ना यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या वादानंतर चंदन शेट्टीनेही एक व्हीडिओ पोस्ट करत या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. ही काही एन्गेजमेंट नव्हती. मी अगदी स्वच्छ हेतून चाहत्यांना आनंदी करण्यासाठी हे केलं होतं, असं चंदन शेट्टीने स्पष्टपणे सांगितलं आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

Loading...

 

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या