रस्त्यावरील उपचार महागात, 20 जणांना एड्सची लागण

कानपूर | रस्त्यावरील डॉक्टरकडून उपचार करणं कानपूरच्या 20 लोकांना चांगलंच महागात पडलंय. कारण त्यांना चक्क एड्सची लागण झाल्याचं समोर आलंय. 

नोव्हेंबर 2017 मध्ये बांगरमऊ तालुक्यातील काही गावांसाठी आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी 20 जणांमध्ये एचआयव्हीची लक्षणं आढळली. पुढील तपासणीत त्यांना एड्सची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

सर्वांची चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. गावात सायकलवरुन येणाऱ्या डॉक्टरकडे या रुग्णांनी उपचार घेतले होते. हा डॉक्टर एकच सुई सर्वांना वापरत असे. पोलिसांनी या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.