बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कॅप्टनने 8 फिल्डर लावले अन् जडेजाने टाकला ‘तो’ थ्रिलर बाॅल पण…

कानपूर | कानपूरमधील (Kanpur Test) ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवला गेला. पाच दिवस चाललेल्या या सामन्याचा निकाल शेवटच्या अखेरच्या षटकात लागला आहे. हा सामना अखेर अनिर्णित राहिला. मात्र, रविंद्र जडेजाच्या शेवटच्या चेंडूवर सर्वांनीच श्वास रोखून ठेवले होते. (last thriller ball of ravindra jadeja)

पहिल्या डावात 49 धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारताने दुसरा डाव 234 धावांवर घोषित केला. त्यानंतर न्यूझीलंडने 235 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव गडगडला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी किवी फलंदाजांना मैदानात टिकू दिलं नाही. एकामागे एक फलंदाज बाद झाले. मात्र, न्यूझीलंडच्या तळीच्या फलंदाजांनी चिवट झुंज दिली. 155 धावावर न्यूझीलंडचा 9 वा फलंदाज तंबुत परतला.

आता भारताला फक्त 1 गडी बाद करायचा होता. मैदानावर रचिन रवींद्र आणि एजाज पटेल हे दोन फलंदाज खेळत होते. या दोघांनी जडेजा आणि आश्विन सारख्या दिग्गज गोलंदाजांना देखील आपली विकेट दिली नाही. या दोघांनी 52 चेंडू खेळून काढले. अखेर सामना संपण्याची वेळ आली. मात्र, आणखी एक षटक होऊ शकतं, असं पंचांनी सांगितलं. त्यावेळी जडेजाकडे ओव्हर आली. आता आर या पारची लढाई होती.

दरम्यान, अखेरच्या षटकात जडेजा समोर एजाज पटेल खेळत होता. कॅप्टन रहाणेने 8 फिल्डर एजाज पटेलच्या बाजूला लावले. मात्र, एजाज पटेलने सर्व चेंडू खेळून काढले आणि भारताच्या विजयावर पाणी फेरलं. अखेर अंधुक प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला आणि सामना अखेर अनिर्णित राहिला.

थोडक्यात बातम्या-

नागपूर नाही मुंबईच!, “मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन मुंबईतच होणार”

मोठी बातमी! हिवाळी अधिवेशनात ‘या’ 12 खासदारांचं निलंबन, 2 शिवसेनेचे

नव्या Omicron व्हेरिएंटची लक्षणं कोणती?; आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

“आम्ही सरकार पाडणार नाही, ज्यादिवशी सरकार पडेल त्यादिवशी…”

‘ही’ मराठी अभिनेत्री का म्हणतेय?, हा ट्रॅप आहे यात अडकू नका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More