बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांची प्रकृती नाजूक; डॉक्टर म्हणतात…

नवी दिल्ली | मागच्यावर्षी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेले ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारा दरम्यान त्यांच्या प्रकृतीत हवी तशी सुधारणा होत नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद हे खूप प्रसिद्ध झाले व त्यांना देशभरातून मदतीचा हात देखील मिळाला. त्यानंतर मात्र त्यांची वागणूक पूर्णपणे बदलली आणि त्यांना मोठं करणाऱ्या व्यक्तीला ते विसरले. त्यानंतर त्यांनी स्वतःचं मोठं हॉटेल सुरू केलं आणि त्यामध्ये कामाला लोकं देखील ठेवले.

हळूहळू कांता प्रसाद यांचं हॉटेल डबघाईला आलं आणि अखेर त्यांनी हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या ‘बाबा का ढाबा’ या जुन्या ठिकाणी ते परतले. यावेळी त्यांनी त्यांचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मुलाची माफी मागत त्याची काहीही चूक नव्हती, असं बोलून दाखवलं.

जुन्या बाबा का ढाबावर परतल्यानंतर कांता प्रसाद यांनी काही दिवसातच आत्महत्येचा प्रयत्न केला व त्यांना आता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. कांता प्रसाद यांची प्रकृती गंभीर असून हवी तशी प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचं दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा; पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आक्रमक

लसीकरण केल्यानंतर कोरोना होणार का?; संशोधनातून ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

पंतप्रधान मोदी करणार काश्मिरी नेत्यांसोबत बैठक; बैठकीपुर्वीच पाकिस्तानात चिंतेचं वातावरण

तृतीयपंथीयांसाठी ‘या’ महापालिकेत राज्यातील पहिलं विशेष लसीकरण पडलं पार

धक्कादायक! लग्नानंतर मित्रानं बोलणं बंद केल्यानं मैत्रिणीने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More