‘मी त्याच्या कानाखाली वाजवेल’; कपिल देव रिषभ पंतवर भडकले

मुंबई | भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) हे सध्या दुखापतग्रस्त असलेला खेळाडू रिषभ पंतवर (Rishab Pant) चांगलेच भडकले आहेत. एवढंच नाही तर रागाच्या भरता मी रिषभच्या कानाखाली वाजवेन, असं कपिल देव म्हणालेत.

रिषभ पंत (Rishabh Pant) लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जेव्हा तो बरा होईल तेव्हा मी जाऊन त्याच्या कानाखाली वाजवेन, कारण त्याच्या दुखापतीने संपूर्ण संघाचे नियोजन खराब केलं. आजच्या तरुणांना अशा प्रकारची जोखीम घेण्याची काय गरज आहे? तरुण पिढीच्या अशा चुकांमुळे मला संताप येतो, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, 30 डिसेंबर 2022 रोजी मध्यरात्री रिषभ पंत एकटाच गाडी चालवत दिल्ली येथून घरी जात असताना त्याच्या कारला भीषण अपघात झाला.

या अपघातात रिषभची गाडी जळून खाक झाली परंतु गाडीची काच तोडून बाहेर पडल्याने रिषभचे प्राण बचावले. परंतु या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली.

मागील एक महिन्यापासून त्याच्यावर मुंबई येथील  कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या पायावर लिगामेंट सर्जरी देखील करण्यात आली असून पुढील काही काळ पूर्णपणे तंदुरुस्त होई पर्यंत रिषभ क्रिकेटपासून दूर राहील.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More