बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसमध्ये दुफळी! कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला घरचा आहेर, म्हणाले…

नवी दिल्ली | देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. मात्र, काँग्रेसचा पाचही राज्यात दारूण पराभव झाला आहे. काँग्रेसच्या पराभवामुळे पक्षनेतृत्वावर आणि घराणेशाहीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला घरचा आहेर (Kapil Sibal criticizes Congress leadership) दिला आहे.

नव्या नेतृत्वाला संधी द्यायला हवी. सुनिल गावसकर यांना एकदिवस निवृत्त व्हावं लागलं होतं. काल परवा पर्यंत विराट कोहली संघाचा कर्णधार होता. सचिन तेंडूलकरलाही संन्यास घ्यावा लागला होता. या तिघांचीही नावे क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिली जातील, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

दिग्गजांनाही एकदिवस संन्यास घ्यावा लागला. बाजूला व्हावं लागलं. आता जाण्याची वेळ आली आहे, असा विचार महान लोक करत असतील तर आपणही पराभव पाहिले आहेत. काँग्रेस नेतृत्वाने आपल्या जागी दुसऱ्याला संधी द्यायला हवी, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी गांधी परिवाराला चिमटे काढले आहेत.

दरम्यान, आता एका कुटूंबाऐवजी सर्वांना काँग्रेस होण्याची गरज आहे. जे लोक नेतृत्व करत होते ते काँग्रेसपासून दूर झाले. सन 2014 पासून आतापर्यंत 177 खासदार आणि आमदारांसह 222 उमेदवार काँग्रेसला सोडून गेले आहेत, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. कुठल्याही राजकीय पक्षातून एवढ्या प्रमाणावर नेते सोडून गेले आहेत हे आजपर्यंत पाहिलं नाही, असा टोला कपिल सिब्बल यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“दरेकरांनी आडनाव बदलून दरोडेखोर करावं”

Russia Ukraine War: एलोन मस्कचं पुतीन यांना खुलं आव्हान, म्हणाले…

‘शैक्षणिक संस्थामध्ये हिजाब बंदी योग्य’; उच्च न्यायालयचा मोठा निर्णय

मुळशी पॅटर्नमधील ‘ती’ चहावाली अभिनेत्री आज कोट्यावधींची मालकीण, वाचा काय करतेय काम

IPL 2022: BCCI नं आयपीएल नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More