बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं राहुल गांधींना फटकारलं, म्हणाले…

नवी दिल्ली | मी पहिली 15 वर्ष उत्तरेतून खासदार होतो. तिथे मला वेगळ्या पद्धतीच्या राजकारणाची सवय लागली होती. केरळमध्ये येणं माझ्यासाठी स्फूर्ती देणारं होतं कारण येथे आल्यानंतर अचानक मला लोकांना मुद्द्यांमध्ये रस असल्याचं लक्षात आलं आणि तेदेखील फक्त वरवरच्या मुद्द्यांवर नाही, असं वक्तव्य खासदार राहुल गांधी यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावरून भाजप नेत्यांची राहुल गांधींवर टीका केली आहे. आता यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्व मतदारांचा सन्मान करायला हवा. मग तो उत्तेरेतील असो किंवा दक्षिनेतील, मतदार हे समजदार असतात. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाण असते, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांना फटाकरलं आहे.

राहुल गांधी काय बोलले आहेत यावर भाष्य करण्यासाठी मी कोणीच नाही. त्यांनी वक्तव्य केलं आहे आणि ते कोणत्या संदर्भात होतं हे तेच सांगू शकतील, असंही कपिल सिब्बल यांनी सांगितलं.

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना देखील कपिल सिब्बल यांनी यावेळी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस देशाची विभागणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा भाजपाचा आरोप हास्यास्पद आहे. हे सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून लोकांमध्ये फूट पाडत आहे, असा आरोप कपिल सिब्बल यांनी भाजपवर केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा वर्षभराचा प्रवास”

“चंद्रकांत खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना निवडणुकीत उभं केलं होतं”

“…तर आगामी काळात विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता येईल”

“मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील”

मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, …तर पेट्रोल-डिझेलची किंमत निम्म्या होतील?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More