कपिल सिब्बल लढवणार मुंबईच्या फेरीवाल्यांचा खटला

कपिल सिब्बल लढवणार मुंबईच्या फेरीवाल्यांचा खटला

मुंबई | मुंबईच्या फेरीवाल्यांची बाजू मांडण्यासाठी आता निष्णात वकील आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल मुंबईत येणार आहेत. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ही माहिती दिलीय. 

मनसेच्या आंदोलनामुळे फेरीवाल्यांंच्या धंद्यावर कुऱ्हाड कोसळलीय. त्यानंतर संजय निरुपम यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र निर्णय विरोधात गेल्याने निरुपम या निर्णयाला आव्हान देणार असून कपिल सिब्बल फेरीवाल्यांची बाजू मांडणार आहेत.

दरम्यान, फेरीवाल्यांना कुठेही धंदा करुन देण्यास न्यायालयाने परवानगी नाकारली होती. निर्धारित क्षेत्रातच फेरीवाल्यांनी धंदा करावा, असं न्यायालयानं म्हटलं होतं. 

Google+ Linkedin