महाराष्ट्र मुंबई

नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांची कामगारांना मारहाण

मुंबई | अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ आणि नगरसेवक कप्तान मलिक यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कप्तान मलिक चार कामगारांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

कुर्ल्यात रस्त्याचे काम सुरु असताना 4 खाजगी कंपनीचे कामगार पाईपमध्ये वायर टाकण्याचे काम करत होते. यावेळी मलिक त्याठिकाणी आले आणि कामाची परवानगी आहे का अशी विचारणा करत कामगारांना मारहाण केली.

कप्तान मलिक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ एक महिन्या अगोदरचा असून कामगारांनी किंवा अधिकाऱ्यांनी पालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे पालिकेचा महसूल बुडत होता. त्यामुळे मला हे पाऊल उचलणं भाग पडलं, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, कामगारांना मारहाण करणाऱ्या कप्तान मलिकांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

ट्रेंडिग बातम्या-

… म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिल्या रोहित पवारांना शुभेच्छा

राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने लढवली ‘ही’ नवी शक्कल!

शरद पवार हे ‘जाणता राजा’च आहेत; आव्हाडांच्या वक्तव्याचं सुशीलकुमार शिंदेंकडूनही समर्थन

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या