चर्चा तर होणारच; करणनं दिलं सिद्धार्थ-कियाराला अत्यंत महागडं गिफ्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणीनं(Kiara Advani) नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

सिद्धार्थ-कियारानं राजस्थानमधील जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं आहे. त्यांच्या या लग्नाला काही बाॅलिवूड मंडळींनीही हजेरी लावली होती.

सिद्धार्थ-कियारानं ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांनी त्यांच्या जोडीला भरभरून प्रेम दिलं. या दोघांची पुन्हा एकदा ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

सिद्धार्थ-कियाराच्या या जोडीला मिळणार प्रेम पाहून करण जोहरनं नुकतंच एक नव्हे तर तब्बल तीन चित्रपटांसाठी त्यांना साइन केलं आहे. त्यामुळं याच्यापेक्षा कोणतंच महागडं लग्नाचं गिफ्ट सिद्धार्थ-कियासाठी असू शकत नाही. परंतु अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

दरम्यान, स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिद्धार्थला बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी देखील करण जोहरनंच दिली होती. यानंतर सिद्धार्थनं आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक सुपरहिट चित्रपट केले.

महत्त्वाच्या बातम्या-

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe