Karan Johar | भाजपच्या खासदार कंगना राणौत नुकत्याच हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. त्यानंतर त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली. चंदीगड विमानतळावर एका महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने कंगनाच्या कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर संबंधित सीआयएसएफ कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आता बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) यावर प्रतिक्रिया दिली आहे.
एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान करण जोहर (Karan Johar) आला होता. त्यावेळी करण जोहरला कंगनाच्या कानशिलात लगावल्या प्रकरणी विचारण्यात आलं होतं. त्यावर करण जोहरने (Karan Johar) दिलखुलासपणे उत्तर दिलं आहे. कंगना आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यातील वाद हा काही नवीन नाही. मात्र असं असलं तरीही करणने कंगनासोबत घडलेल्या घटनेवर भाष्य केलं आहे.
काय म्हणाला करण जोहर?
“मी कोणत्याही हिंसाचाराचं मग तो शाब्दिक असो वा मानसिक असो त्याचं मी समर्थन करणार नाही किंवा त्याचा स्वीकार करणार नाही”, असं म्हणत करणने स्मितहास्य केलं होतं. कंगनाच्या या घटनेबाबत बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी सुरूवातीला कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अनेकांनी त्यावर मौन बाळगलं होतं. तेव्हा कंगनाने बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.
#WATCH | Mumbai: On Kangana Ranaut slapped by CISF woman constable, filmmaker Karan Johar says, “I do not support or condone any form of violence, verbal or physical.” pic.twitter.com/WAiSHneYZx
— ANI (@ANI) June 12, 2024
नेमकं काय घडलं होतं?
चंदीगड विमानतळावरील घटनेनंतर कंगनाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत नेमकं काय घडलं होतं, त्याविषयी सांगितलं होतं. दिल्लीला जाताना चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एक महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने मला थप्पड मारली आणि शिवीगाळ केली, असं कंगणाने सांगितलेलं.
दरम्यान, मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौत निवडून आली. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. तसेच भाजपने कंगनाने मंडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढवण्याची संधी दिली होती.
News Title – Karan Johar React On Kangana Ranaut Slapped
महत्त्वाच्या बातम्या
नवरा मैत्रिणीसोबत करत होता रोमान्स, तेवढ्यात बायकोने पाहिलं अन्…;संभाजीनगर हादरलं
गोळीबार प्रकरणात सलमान खानचा धक्कादायक जबाब; म्हणाला..
“जीव देऊन भागणार नाही बाळांनो, तुम्हाला माझी शपथ”; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
भाजप अजित पवारांना वाऱ्यावर सोडणार?, विधानसभेआधी मोठा निर्णय घेणार
“मातोश्रीवर चाल करू पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरनी घायाळ झाली”