बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करण जोहरनं कार्तिक आर्यनला सिनेमातून काढलं, यापुढेही काम देणार नाही?

मुंबई | निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने 2019मध्ये आपल्या ‘दोस्तना’ या चित्रपटाचा सिक्वल जाहीर केला होता. यात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार होता. पण कार्तिक आर्यनला या सिनेमातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.

कार्तिक आर्यनला या सिनेमातून बाहेर काढण्याचं कारण कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातला वाद असल्याचं बोललं जात आहे. मात्र कार्तिकला चित्रपटातून काढून टाकण्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. कार्तिकने या चित्रपटाचं शूटिंग कित्येक महिने पुढे ढकललं होतं. तर हा चित्रपट सोडून त्याने राम माधवानीच्या ‘धमाका’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होतं, त्यामुळे करण त्याच्यावर चिडला होता, अशी महिती आहे.

बॉलिवूडमध्ये कलाकारांना चित्रपटातून काढून टाकण्याची गोष्ट काही नवी नाही . या प्रकरणावर अद्याप कार्तिकचे कोणतेही स्टेटमेंट समोर आले नाही तर दुसरीकडे सोशल मीडियावर कार्तिकच्या चाहत्यांनी करण जोहरच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे.

कार्तिकसारख्या अभिनेत्याबरोबर असं होऊ नये आणि आम्ही त्याला दुसरा सुशांत सिंग राजपूत होऊ देणार नाही, असं काही चाहत्यांचं म्हणणं आहे. यावरून अभिनेत्री कंगणा राणावतने देखील प्रतिक्रिया दिली आहे. कंगणाने ट्विट करत करण जोहरवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“कोरोनाची दुसरी लाट जितक्या वेगानं आली, तितक्याच वेगानं जाणार”

काळजाचा ठोका चुकवणारी घटना; मांत्रिकाकडे जाऊन उपचार घेणं कोरोनाबाधित महिलेच्या जीवावर बेतलं

70 वर्षांच्या वडिलांना मुलानं चाकूनं भोसकून संपवलं; कारण ऐकून पोलिसही हादरले

‘केंद्र सरकारने कंपन्याना महाराष्ट्रात रेमडेसिवीर न पुरवण्यास सांगितलंय’; नवाब मलिक यांचा धक्कादायक खुलासा

वसंत मोरेंनी हॉटेलमध्ये 40 ऑक्सिजन बेड उभारले, पुण्याच्या नगरसेवकांना दाखवला आरसा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More