बंगळुरू | कर्नाटक निवडणुकीत भाजपने 104 जागा मिळवल्या तरी सर्वोच्च न्यायालयाने चोवीस तासांत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिल्याने आम्हांला अपयश आलं, असं भाजप प्रदेशाध्यक्ष येडीयुरप्पा म्हणाले.
युती सरकारमध्ये अर्थसंकल्पामुळे वाद सुरू असून हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, तसंच त्यांच्यातील काही नेतेच सरकारबद्दल नकारात्मक बोलत आहेत, असंही ते म्हणाले.
राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. मात्र, काँग्रेसनं याबाबत आक्षेप घेऊन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर मध्यरात्री सुनावणी करून केवळ चोवीस तासांत बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली, त्यामुळे आम्हांला अपयश आलं असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी जाहिर
-… तर एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही- राजू शेट्टी
-राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हत्येचा कट फसला; काँग्रेसचा नगरसेवक फरार!
-गिरीश महाजनांसमोर खडसेंनी घेतलं झुकतं माप!
-शरद पवारांच्या ‘या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या स्वप्नावर गदा