बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधीच्या पत्रकारभेटीचे पास 1 लाखाला विकले; ‘या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार भेटीसाठी पास तयार करण्यात आले होते. हे पास 50 हजार ते 1 लाख रुपयांना विकण्यात आले, असा आरोप काँग्रेसचे निलंबित नेते कराटे त्यागराज यांनी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यावर आरोप केला आहे.

तमिळनाडूमधील काँग्रेस नेत्यांनी एकमेकांचे वाभाडे काढायला सुरवात केली आहे. काँग्रेसचे माध्यम समन्वयक गोपण्णा यांनी हे पास विकल्याचा कराटे यांनी आरोप केला आहे.

चेन्नईचे जिल्हाध्यक्ष असलेले त्यागराज यांना पक्षाविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून निलंबित केलं होतं. त्यांनी स्वीपक्षीयांवर केलेल्या आरोपांवरुन ते पक्षावर चांगलेच भडकल्याचं दिसतंय.

दरम्यान, त्यागराज यांनी काँग्रेससाठी काम न केल्याचा आणि पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या-

-“आरक्षणाच्या आड कुणी आलं तर शिवसेना पूर्ण ताकदीने मराठ्यांच्या बाजूने उभी राहणार”

-विनोद पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल मानले आभार

-चौथ्या क्रमांकावर कोण बॅटींग करणार?; स्पृहा जोशी म्हणते…

-सुषमा स्वराज यांनी सोडलं शासकीय निवासस्थान; सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव

-के.पी. पाटलांच्या मेहुण्यासह जावयानेही केली एकाच मतदारसंघातून उमेदवारीची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More