बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तिसऱ्यांदा आई बनणार करिना कपूर?, पोस्ट करत म्हणाली…

मुंबई | बॉलिवूडची प्रसिद्ध तारका करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) तिसऱ्या मुलाची आई बनणार आहे, अशी चर्चा सध्या रंगत आहे. 2012 साली करिना व सैफने विवाह केला होता. या बॉलिवूड दाम्पत्याला तैमुर अली खान पतौडी (Taimur Ali Khan Pataudi) आणि जहांगिर अली खान पतौडी (Jahangir Ali Khan Pataudi) अशी दोन मुलं आहेत.

गेल्या काही दिवसांअगोदर करिना कपूरचे काही फोटो समाज माध्यमांवर (Social Media) प्रसारीत झाले होते. या फोटोत ती तिसऱ्यांदा गरोदर (Pregnant) आहे असे दिसत होते. तिचे गरोदरपन ह्या फोटोतून तिच्या चाहत्यांना कळाले. यानंतर करिना कपूर हीने स्वत: माहिती देच यामागचे गौडबंगाल समोर आणले आहे. तिने तिच्या गरोदरपनाविषयी पोस्ट करत माहिती दिली आहे.

तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याची माहिती दिली. त्यात ती म्हणते, शांत रहा, मी प्रग्नेंट नाही. सैफचे म्हणणे आहे की, त्याने आधीच लोकसंख्यावाढीत जास्त योगदान दिले आहे. अश्या प्रकारची मजेशीर पोस्ट तिने आपल्या अकाऊंटवरून केली आहे.

दरम्यान, मला जे पोट दिसत आहे ते, पास्ता आणि वाईनमुळे आलेले आहे. समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या या अफवांची तिने स्वत: फिरकी घेतली आहे.

थोडक्यात बातम्या –

आमदारांच्या अपात्रतेवर आज निकाल; शिंदे सरकारचं भविष्य ठरणार

‘पूर्वीचे सुलतान मंदिरं पाडायचे,आताचे सुलतान शिवसेना पाडतात’; खासदार फोडल्यानंतर सेना आक्रमक

मोठी बातमी! संजय राऊतांना पुन्हा एकदा ईडीचा झटका

नवाब मलिकांना ईडीचा दणका, तुरूंगातील मुक्काम वाढणार?

फोन टॅपिंग प्रकरणी ईडीची सर्वात मोठी कारवाई!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More