बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सीताच्या भूमिकेसाठी करीनाने मागितलं होतं ‘इंके’ मानधन, तापसीनं केली बेबोची पाठराखण

मुंबई | सर्वांची आवडती बाॅलिवूड अभिनेत्री करिना कपूर उर्फ बेबो सध्या ट्विटरवर प्रचंड ट्रोल झाली होती. सीताच्या भूमिकेसाठी करिनाने 12 कोटी रूपये मागितल्याची चर्चा होती. यानंतर अनेकांनी सीताच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीला घ्या असं म्हणत कमेंट्स केले होते. अशातच तापसीने करीनाची पाठराखण करत तिने केलेली मागणी योग्य असल्याचं म्हटलं आहे.

याबाबत तापसीने बाॅलिवूड बबल या मुलाखतीत करीना देशातील महिला सुपरस्टार्सपैकी एक असल्याचं तापसीने म्हटलं आहे तसेच. ती जास्त मानधन मागत असेल तर तिचे काम बोलत असून पौराणिक चित्रपटात भूमिका साकारणारे पुरुष विनामूल्य काम करतात, असं तुम्हाला वाटतं का?, असा सवाल करत मला तरी असं वाटतं नाही, असं देखील तापसीने म्हटलं आहे.

यावेळी बोलताना हिरोने फी वाढवली की कोणाला काहीही फरक पडत नाही. त्याच्यावर कोणीच टीका करत नाही, मात्र हिरोईनने फी वाढवली म्हटलं की, तिच्यावर टीका सुरू होत असल्याचं तापसीने म्हटलं आहे. करीनाच्या जागी चित्रपटाच्या हिरोने एका विशिष्ट रकमेची मागणी केली असती तर कोणाला काहीही फरक पडला नसता, असं तापसीचं मत आहे.

दरम्यान, करीना कपूर बाॅलिवूडमधील सर्वात गाजलेली हिरोईन असून सर्व लोकांची देखील आवडती अभिनेत्री आहे. हिरोची फी वाढली असती तर ‘इसकी मार्केट व्हॅल्यू बढ गयी है’ म्हणत ते सर्वांनी स्वीकारलं असतं मात्र हिरोईनने विशिष्ट रकमेची मागणी केल्यावर लगेच अनेकांच्या भुवया उंचावल्या असून एका महिलेने विशिष्ट मानधनाची मागणी का करू नये? असा सवाल तापसीने केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“संभाजी भिडे महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, त्यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल करावा”

वडिलांचा निर्णय, मुलाची कमाल; 12 वर्षीय अभिमन्युनं मोडला तब्बल 19 वर्षांचा रेकाॅर्ड

आम्हीही विरोधकांशी लढायचं ठरवलंय…, अर्जुनाप्रमाणे आम्हीही सर्व बाण परतवू – संजय राऊत

मोदी कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली; देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी?

“सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाहीवर निवडणुका हा खात्रीशील इलाज नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More