मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन!

Photo Credit- Instagram/ Kareena Kapoor

मुंबई । बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफअली खान यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. शनिवारी रात्री करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

करीना कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. दोन दिवसांपूर्वी सैफची बहीण सबा अली खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

सबाने सैफचा एक जुना फोटो शेअर केला होता. यात त्याच्यासोबत लहान इब्राहीमही दिसत आहे. ‘हा एक छोटासा इशारा आहे, माझे चॅम्प’, असे कॅप्शन या फोटोसाबत लिहले होते. त्यामुळे करीनाला पुन्हा मुलगाच होणार, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती.

करिना आणि सैफ यांनी घरात पुन्हा एकदा गोड बातमी असल्याचं काही महिन्यांपूर्वी चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. फेब्रुवारी महिन्यात करिना बाळाला जन्म देणार असल्याची माहितीही त्यानं दिली होती.

थोडक्यात बातम्या-

संतापजनक! शौचासाठी शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

विना मास्क बुलेट सवारी करणं पडली महागात; नवनीत राणा आणि आमदार रवी राणांवर गुन्हा दाखल

गजानन मारणे प्रकरणाला वेगळं वळण; ‘ती’ लॅंड क्रुझर आणणाऱ्यासह 8 जणांना अटक!

पल्लवी पाटीलचे बोल्ड फोटो सोशल मीडियात व्हायरल!

“खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला, शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं पाहिजे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या