Kareena Kapoor | बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी अज्ञाताने केलेल्या चाकू हल्ल्यामागे (Knife Attack) चोरीचा उद्देश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सैफची पत्नी करीना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) ४०-५० लोकांची चौकशी केली असून करीना कपूरचाही (Kareena Kapoor) जबाब नोंदवला आहे.
करीनाचा जबाब आणि हल्ल्याच्या रात्रीचा थरार
करीनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात हल्ल्याच्या रात्रीचा (Night of the Attack) थरार (Horror) कथन केला आहे. आरोपी जेव्हा घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक (Aggressive) होता. त्याने घरातील कुठल्याही सामानाला हात लावला नाही किंवा चोरी केली नाही.
झटापटीदरम्यान आरोपी आक्रमकपणे सैफवर हल्ला करत होता. मात्र, कुटुंबातील (Family) लोक कसेबसे घराच्या १२ व्या मजल्यावर (12th Floor) गेले. घरात ज्वेलरी (Jewelry) समोरच ठेवलेली असतानाही हल्लेखोराने त्याला हातही लावला नाही, असे करीनाने जबाबात म्हटले आहे. या घटनेमुळे करीना (Kareena Kapoor ) इतकी घाबरली होती की तिची बहीण करिश्मा (Karishma) तिला स्वतःच्या घरी घेऊन गेली.
करीनाने सांगितला थरार
करीनाने (Kareena Kapoor ) जबाबात सांगितले की, घरातील मुले (Children), महिलांना (Women) वाचवण्यासाठी सैफने हल्लेखोराला रोखण्याचा (Resist) प्रयत्न केला. आरोपी त्यांचा लहान मुलगा जहांगीरवर (Jehangir) हल्ला करायला आला होता, असे तिला वाटले. कारण, हल्लेखोर त्याच्या खोलीत होता. महिलांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, सैफनेही त्याला रोखले. त्यामुळे तो जहांगीरपर्यंत पोहोचू शकला नाही. या झटापटीत आरोपीने सैफवर अनेकदा चाकूने वार केले. जेव्हा आरोपी सैफवर हल्ला करत होता तेव्हा संधी मिळताच करीनाने लहान मुले आणि महिलांना १२ व्या मजल्यावर पाठवले. हल्लेखोराने घरातील कुठलीही वस्तू चोरली नाही, घरातील कपाटात ज्वेलरी तशीच होती.
दरम्यान, पोलिसांनी या हल्ल्यातील आरोपीची ओळख पटवली असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने मुंबईच्या पूर्व उपनगरात (Eastern Suburbs) ११ डिसेंबरला अशाच प्रकारे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
लोकांनी त्याला पकडले परंतु मानसिक रोगी (Mentally Unstable) समजून त्याला पोलिसांच्या हवाली केले नाही. पोलीस सध्या या संशयिताच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड (Record) तपासत आहेत. हा व्यक्ती पकडल्यानंतर स्वतःला डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) असल्याचे सांगत होता.
Title : Kareena Kapoor statement about Saif Ali Khan Attack
महत्वाच्या बातम्या-
शुद्धीवर आल्यावर सैफने सर्वात पहिले डॉक्टरांना विचारला ‘हा’ प्रश्न
फलटण हादरलं! उसाच्या शेतात सापडला अर्धवट अवस्थेतील मृतदेह
थरकाप उडवणारी घटना! मित्राचा चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं, धक्कादायक कारण समोर
‘या’ ठिकाणी कधीही गप्प बसू नका, नाहीतर तुम्ही मूर्ख ठराल
सैफ अली खानच्या हॉस्पिटलचा खर्च समोर, सोशल मीडियावर कागदपत्र व्हायरल